Dharma Sangrah

खेळण्यासाठी मुलाला दिला मोबाईल, मुलाने शोधले बापाचे लफडे

Webdunia
बंगळुरुमध्ये राहणाऱ्या नागाराजूला (४३) ला आपल्या  मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे चांगलेच महागात पडले आहे. कारण मुलाने मोबाइलमधून वडिलांचेच विवाहबाह्य संबंध शोधून काढले. नागाराजूचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. मोबाइलमधले प्रेयसीसोबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या हाती लागले. ही गोष्ट त्याने आईच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे  १५ वर्षाचा संसार आता उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. नागाराजूलाच्या पत्नीने नवऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसात धाव घेतली आहे. नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. पत्नी शाळेत शिक्षिका आहे.
 
या घटनेत ११ जुलैला नागाराजूने त्याचा मोबाइल फोन मुलाला खेळण्यासाठी दिला होता. खेळता खेळता मुलाने फोन रेकॉर्डर आणि व्हॉट्स अॅप चॅट ओपन केला. त्यावेळी त्याला वडिलांचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे कळले. वडील आणि संबंधित महिलेमध्ये झालेले अश्लील संवादाचे मेसेजेस त्याने पाहिले. त्याने लगेच आईला ते सर्व मेसेज दाखवले. जेव्हा पत्नीने नागाराजूला याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. याबद्दल कुटुंबीयांकडे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी नागाराजूने धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

पुण्यातील कर्वेनगरमध्ये मुदत संपलेल्या शीतपेयांचा साठा जप्त, एफडीएच्या कारवाईच्या भीतीने टाकून देण्याचा संशय

LIVE: वर्ध्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, २१ जनावरांचा मृत्यू

माध्यमांना बोट दाखवल्याच्या आरोपां संदर्भात आरोपी सियाच्या वडिलांनी मोठा दावा केला

मान्सूनने मुंबईत हाहाकार माजवला, ३ दिवसांत जुलै महिन्यातील निम्म्याहून अधिक पावसाची नोंद

केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन

पुढील लेख