Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पुण्यातल्या दहावीच्या परीक्षेला वडील पास, मुलगा नापास

SSC result 2022
, शुक्रवार, 17 जून 2022 (22:26 IST)
पुणे  दहावी हा शिक्षणाचा आणि जीवनाचा पाया समजला जातो. दहावीत अनेकांचा पाय घसरतो, अनेक जणांना असंख्य वेळा प्रयत्न करूनदेखील उत्तीर्ण होता येत नाही. मात्र हालाखीच्या परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, याचं शल्य मनात ठेवून एका व्यक्तीनं तब्बल तीस वर्षानंतर दहावीची परिक्षा देण्याचं ठरवलं. पुण्याच्या डायस प्लॉट झोपडपट्टीतील रहिवासी भास्कर लिंबाजी वाघमारे यांनी वयाच्या 43 व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन दाखवली आहे. ते 1992 ला सातवी उत्तीर्ण होते, त्यानंतर तीस वर्षानंतर दहावी चा फॉर्म भरून ते 46 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. विषेश म्हणजे त्यांचा मुलगा देखील यंदा दहावीच्या परिक्षेसाठी बसलेला होता मात्र तो उत्तीर्ण होऊ शकलेला नाही.
 
भास्कर लिंबाजी वाघमारे यांचा दहावीच्या परीक्षेला बसलेला मुलगा साहिल भास्कर वाघमारे हा अनुत्तीर्ण झाला आहे. मात्र भास्कर यांनी आपल्या मुलावर नाराज न होता त्याला पुन्हा प्रयत्न करण्य़ाचा सल्ला दिला आहे. अपयशाला भिडायचं असतं घाबरायचं नसतं, पुढच्या वेळी जोमानं अभ्यास करून उत्तीर्ण हो असा दिलासा देखील त्यांनी आपल्या मुलाला दिला आहे. बाप उत्तीर्ण अन् मुलगा अनुत्तीर्ण यामुळे भास्कर यांच्या कुटूंबात कही खुशी कही गम असं वातावरण निर्माण झालं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी बिल्डरला ड्रोन उडवणं भोवलं; एफआयआर दाखल