Dharma Sangrah

महाराष्ट्रात एफडीएची पाच जिल्ह्यांत धाड, भेसळयुक्त दुधाच्या रॅकेटचा पर्दाफाश;१३ जणांना अटक

धनश्री नाईक
मंगळवार, 7 जुलै 2026 (15:31 IST)
एफडीए आणि पोलिसांनी महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांत धाडी टाकून कृत्रिम दूध बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. माहितीनुसार १.४८ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि १३ आरोपींना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे एफडीएने पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने पाच जिल्ह्यांत संयुक्त कारवाई करून दुधातील भेसळीच्या संघटित नेटवर्कचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान, अंदाजे १.४८ कोटी रुपयांचा माल जप्त करण्याबरोबरच २०,००० लिटर संशयित दूध घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.

याव्यतिरिक्त, विविध कलमांखाली २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि संपूर्ण भेसळ नेटवर्कविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाच खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहे आणि चार आस्थापनांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. एफडीएच्या तपासात असे उघड झाले की, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पाम तेल यांसारख्या घटकांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात होते आणि नंतर ते नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विकले जात होते. या तपासात या नेटवर्कची पुरवठा साखळीही उघड झाली.
ALSO READ: महाराष्ट्रात पावसाचे रुद्ररूप 13 मृत्यू तर महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बंद
पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ जुलै रोजी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान, दूध संकलन केंद्रे, शीतकरण केंद्रे, पॅकिंग युनिट्स आणि भेसळयुक्त साहित्य असलेल्या साठवणूक सुविधांची झडती घेण्यात आली. या प्रकरणी २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत १३ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ALSO READ: मुंबईनंतर आता पुण्यात सोमवार पेठ परिसरात बहुमजली इमारत कोसळली
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; सिया आणि चेतन यांचे लग्न झाले आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

LIVE: सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुरी जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी; गुदमरून एका भाविकाचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याची भीती

भिकाऱ्याच्या घरातून ५४ कोटी रुपयांचे सोने जप्त, गुवाहाटीत अटक, महाराष्ट्राशी थेट संबंध

पंतप्रधान होऊ शकले नाही, पण ते राष्ट्रपती होऊ शकतात! एनडीए त्यांचे स्वागत; शरद पवारांना रामदास आठवलेंचे खुले आमंत्रण

दिसायला क्लास, मायलेज भारी! ८० किमीचा ॲव्हरेज देणाऱ्या 'या' नव्या बाईकने मार्केटमध्ये उडवली खळबळ; किंमत तुमच्या बजेटमध्ये

पुढील लेख
Show comments