Marathi Biodata Maker

कोकणात FDA ची धडक कारवाई, रत्नागिरीत तब्बल ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा जप्त

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 17 जून 2026 (15:44 IST)
रत्नागिरीत गुटखा माफियांना झटका लागला आहे, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) रत्नागिरीत धडक कारवाई करत तब्बल ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) ने नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी मोठी मोहीम राबवली आहे. यात ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली.  हॉटेल्स, बेकरी, दुकाने अश्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. 
ALSO READ: रिक्षात फिरण्याची यांची औकात नव्हती; आता "चार्टर्ड विमाने...संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली
जप्त केलेला माल मुख्यतः प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य उत्पादने हे आहे. तसेच 
संबंधित दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यव्यापी मोहिमेचा भाग आहे.
ALSO READ: सावंतवाडीत विहिरीत १५ पिल्लांसह अडकलेल्या ८ फुटी महाकाय मगरीला जीवदान; वन विभागाची थरारक रेस्क्यू मोहीम
महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी इत्यादी उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री पूर्णपणे प्रतिबंधित आहे. FDA सतत अशा कारवाया करत आहे आणि MCOCA सारख्या कठोर कायद्यांचा वापर करण्याची तयारी दाखवत आहे. या उत्पादनांमुळे कॅन्सरसह इतर गंभीर आजार होण्याचा धोका असतो. 
ALSO READ: कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहीम यशस्वी; 'ऑलिव्ह रिडले' कासवांच्या संवर्धनाला मोठे यश, पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले
Edited By- Dhanashri Naik
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

क्रिकेटर अभिषेक पोरेल विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

France vs Iraq: फ्रान्सने इराकला ३-० ने हरवून अंतिम ३२ संघांच्या फेरीत प्रवेश केला

लग्न करायचं नव्हतं तर नकार द्यायचा, जीव का घेतला?" केतनच्या वडिलांनी व्यक्त केलं दुःख

मुंबई लोकल ट्रेनमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

नागपूरच्या दिघोरी रोडवर प्रवासी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments