Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लढा ओमायक्रोन विरुद्ध, नाशिकमध्ये होणार ओमायक्रोनची चाचणी

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (21:13 IST)
राज्यात ओमायक्रोनने पाय पसरायला सुरुवात केल्यामुळे नाशिक प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रोनची चाचणी आता नाशिकमध्ये  करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मनपा तसेच जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी हि माहिती दिली. नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ओमायक्रोनचे सावट देखील नाशिकववर आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील लॅब मध्ये ओमायक्रोनचा अहवाल तपासणीसाठी पाठविला जात आहे. मात्र या आठ दहा दिवसांचा विलंब लागत असल्याने या कालावधीत ओमायक्रोन पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्येच हि चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान ते पुढे म्हणाले कि, आरटीपीसार चाचणीसाठी लागणारे साहित्य घेणार आहोत. यात दोन प्रकारचे किट असून यामध्ये तीन जीनचे किट ६० ते ७० रुपयाला मिळतात. तर चार जीनचे तपासणी किट २५० रुपयांपर्यंत मिळतात. त्याप्रमाणे शहर आणि ग्रामीणमध्ये १० हजार किट घेणार आहोत. या माध्यमातून संशयित रुग्ण आणि परदेशी नागरिक, त्यांच्या संपर्कातील नागरिक यांची तपासणी चार जीनच्या किट द्वारे होईल. नाशिकमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची प्रथम तपासणी करण्यात येणार असून त्याचबरोबर त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे चाचणी ही ‘एस’ जीनद्वारे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
काय आहे ‘एस’ जीन
आरटीपीसीआर टेस्ट करताना दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. एका किटमध्ये तीन जीन ची तपासणी केली जाते. दुसऱ्या किटमध्ये चार जिनची तपासणी केली जाते. दुसरा किटमध्ये चौथा जीन ‘एस’ जीन असतो. हा जीन जर निगेटिव्ह असला तर ओमायक्रोन असल्याची दाट शक्यता असते. मात्र ‘एस’ जीन जर पॉझिटिव्ह असला तर ओमायक्रोन असल्याची शक्यता कमी असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

लेबनॉनमध्ये सहा इस्रायली सैनिक ठार,IDF लष्करी मुख्यालयावर हल्ला

Chandrashekhar Bawankule Profileचंद्रशेखर बावनकुळे प्रोफाईल

Milind Deora Profile मिलिंद देवरा प्रोफाइल

Aaditya Thackeray Profileआदित्य ठाकरे प्रोफाइल

Chhagan Bhujbal Profile छगन भुजबळ प्रोफाइल

पुढील लेख
Show comments