Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारकडून वेतनासाठी एसटीला १३० कोटी रुपये अंतिम निधी

Webdunia
शुक्रवार, 7 मे 2021 (15:59 IST)
एसटी मागील अनेक वर्षे आर्थिक तोटा सहन करते. आता एसटी महामंडळामधील एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारकडून वेतनासाठी १३० कोटी रुपये अंतिम निधी मिळाला आहे. यातून कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर एसटी महामंडळाकडे पगारासाठी एकही रुपये शिल्लक राहणार नसल्याने मे महिन्याचे आणि त्यानंतरचा महिन्याचे वेतन द्यायचे कसे असे मोठे संकट महामंडळसमोर आहे. 
 
आधीच कमी पगार त्यात आता मे महिन्यापासून पगार मिळणार की नाही याचीही शाश्वती नसल्याने कर्मचाऱ्यांवर बिनपगारी काम करण्याची वेळ ओढावली आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी पगार नसल्याने आत्महत्याही केल्याचा घटना समोर आल्या होत्या.
 
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक तोट्यातून जावे लागले. त्यावेळी राज्य सरकारने नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या महिन्यांत एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी १ हजार कोटी रुपयांचे पॅकेड जाहीर केले. या पॅकेजमधील १२० कोटी रुपये राज्य सरकारने महामंडळाला कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२० महिन्याचे पगार देण्यासाठी दिले. परंतु राज्य सरकारच्या पॅकेजमधील ८८० कोटी रुपये शिल्लक होते. मात्र ही उर्वरित रक्कम महामंडळाने कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार देण्यासाठी वापरली. त्यामुळे महामंडळाकडे स्वत:ची काहीच शिल्लक रक्कम नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

महाराष्ट्रात सरकार बदलणे गरजेचे म्हणत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments