Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आगीमुळे एक हजार कोटींचे नुकसान झाले : पूनावाला

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (22:25 IST)
सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीत कोरोना लसीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. लसी सुरक्षित आहेत. मात्र या आगीमुळे एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली. 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी मीडियाने आदर पुनावाला यांनाही काही प्रश्न विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. सीरमला लागलेल्या कालच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरसचंही मोठं नुकसान झालं आहे, असं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं.
 
तसेच कोव्हिशिल्ड लस दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे या लस सुरक्षित आहेत. तसेच या लसीच्या उत्पादनावरही कोणताही परिणाम झालेला नाही. ज्या ठिकाणी आग लागली तिथे कोणत्याही व्हॅक्सिनची निर्मिती होत नव्हती. केवळ भविष्यात या ठिकाणी लस ठेवण्यासाठी या इमारतीचं काम सुरू होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments