Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (08:17 IST)
मुंबई,  : नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
 
मार्च 2023 पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आतापर्यंत भाऊबीज दिली होती. आजच्या शासन निर्णयामुळे दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर,2023 या कालावधीत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज भेट दिली असून यापूर्वी दिलेली भाऊबीज भेट म्हणून दिलेले 37 कोटी 33 लाख रुपये  आणि आज नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना  भाऊबीज भेट म्हणून दिलेले 3 कोटी असे एकूण 40 कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास  विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments