Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मूंबईच्या नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं

मूंबईच्या नायर रुग्णालयातून चोरीला गेलेलं पाच दिवसांचं बाळ सापडलं
मध्य मुंबईच्या नगर निकायद्वारे संचालित नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. गुरुवारी संध्याकाळी एका महिलेने पाचच्या सुमारास बाळ चोरी केलं होतं. मात्र चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात यश आलं आहे.
 
13 जून रोजी नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तेव्हा बाळाची आई शीतल साळवी झोपली होती. झोपेतून जाग आल्यावर तिला बेडवर बाळ दिसलं नाही तर तिने रुग्णाल्यातील कर्मचार्‍यांना याबाबद माहिती दिली. कर्मचार्‍यांनी हॉस्पिटलमध्ये लागलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासल्यावर एक महिला आपल्या बॅगमध्ये मुलं ठेवून रुग्णालयातून बाहेर निघताना दिसली. 
 
माहितीनुसार, महिला गुरुवारी संध्याकाळी बाळाला घेऊन सांताक्रूझमधील व्ही.एन.देसाई या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. वाकोला परिसरातून पोलिसांनी बाळ आणि महिलेला ताब्यात घेतले.
 
रुग्णालयातून बाळ चोरणाऱ्या महिलेचे नाव हझेल डोनाल्ड, वय 37 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेने नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून बाळ चोरलं होतं. आरोपी महिला मूळची कोरियाची असून नालासोपारा परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SCO Summit: नरेंद्र मोदींसाठी ही बैठक महत्त्वाची का?