Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

Ratnagiri Nagpur National Highway accident
, गुरूवार, 18 मे 2023 (11:32 IST)
मिरजेजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरने बोलेरो गाडी जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. 
 
मिरज तालुक्यातल्या वटी नजीक असणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा भीषण अपघात घडला. मृत आणि जखमी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातल्या सरवडे गावचे आहेत. पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना पवार कुटुंबावर हा काळाचा घाला पडला आहे.
 
पवार कुटुंबीय प्रवास करत असलेल्या बोलेरो कारला विटा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. अपघात एकाच कुटुंबातील पाच जण जागेचे ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. जयवंत पवार, आर्यन पवार, साक्षी पवार, सोहम पवार, आणि श्रावणी पवार अशी मृतांची नावे आहेत.
 
पवार कुटुंबीय हे पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी बोलेरो गाडीतून निघाले असताना बाराच्या सुमारास त्यांची कार ही मिरज नजीक असणाऱ्या वड्डी हद्दीत पोहचली असता समोरून विरुद्ध चुकीचे दिशेने विटाने भरलेलं ट्रॅक्टर अचानक समोर आला. तेव्हा चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव बोलेरो ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. 
 
जखमींना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक सिद्धरामय्या मुख्यमंत्री, डीके शिवकुमार डिप्टी सीएम