Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊसाचा अंदाज

Forecast of unseasonal rain in Vidarbha and Marathwada विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊसाचा अंदाज  Marathi Regional News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (08:42 IST)
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वांरवार होणाऱ्या अवकाळीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. आता पुन्हा अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात 19 आणि 20 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. याआधीच अवकाळीमुळे बळीराजा कोलमडून पडलाय. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तरुणाने आपल्या घरावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला