Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अखिलेश यादव जाहीर सभेला संबोधित करणार

Maharashtra News
, शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (09:58 IST)
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यावेळी ते मालेगाव आणि धुळे येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. तसेच यावेळी ते मालेगाव आणि धुळे येथे जाहीर सभांना संबोधित करणार आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात आपली ताकद दाखवत आहे.
 
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव आज 18 ऑक्टोबर रोजी मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित करणार असून  उद्या ते 19 ऑक्टोबर रोजी धुळ्यातील राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. ते दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून  निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्ष आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशाबाहेरही आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे कारण सपाचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंबरनाथमध्ये पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी फरार आरोपीला वाराणसी येथून अटक