Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक मुंबई महामार्गाबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली “ही” मागणी

Webdunia
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (15:45 IST)
मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे.
 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ४ ऑक्टोबर २०१४ रोजी नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे. नाशिक ते मुंबई हा फोर लेन रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे.
 
शहापुर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होतो. जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्कचा प्रसार त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी तासंतास प्रवाश्यांचा वेळ यामध्ये जात आहे. लॉजिस्टिक्स पार्कमुळे मोठमोठे कंटेनर क्रॉसिंग व कंटेनर वाहतुकीमुळे सतत वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
 
त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबी मधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
 
पुढे म्हटले आहे की, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१४ मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षाने या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधीत कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
 
रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सहापदरी रस्त्याचे प्रत्यक्ष काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे यांनी पुण्यात व्हीबीएचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली

महाराष्ट्रः खऱ्या-खोट्याच्या लढाईत अडकले उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे-अजितपवार

Maharashtra Live News Today in Marathi शनिवार 9 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

काँग्रेस जातींना लढविण्याचे काम करत आहे, महाराष्ट्रात गरजले नरेंद्र मोदी

नागपुरमध्ये भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments