माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं.ते निमोनियाने ग्रासले असून अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
बबन राव ढाकणे यांनी गोवामुक्ती सत्याग्रहात भाग घेतला. त्यांनी पंचायत समिती, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभा मध्ये होते. त्यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनतापक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ऊर्जा राज्य मंत्री पदावर होते. तसेच त्यांनी जनता दल, जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी विचारदल पक्षात काम केले आहे.
बबन राव ढाकणे यांच्या पार्थिवाला आज पार्थडीच्या हिंदसेवा वसतिगृह येथे आज दुपारी ते उद्या दुपारी एक वाजे पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पार्थडी तालुक्यात पागोरी पिंपळगावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.