Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रेडिट कार्ड ॲक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांचा ऑनलाईन गंडा

Webdunia
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (20:49 IST)
नाशिक: बँकेचे क्रेडिट कार्ड ॲक्टीव्हेट करण्याच्या बहाण्याने अनोळखी इसमाने सुमारे 4 लाख 63 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुचनय सूचित चॅटर्जी (वय 40) हे खुटवडनगरमधील चाणक्यनगर येथे राहतात. ते दि. 19 ते 20 ऑक्टोबरदरम्यान कॉलेज रोड येथे गेले होते. त्यावेळी त्यांना 18604195555, तसेच 7479039814 या दोन मोबाईल क्रमांकांवरून दोन अनोळखी इसमांनी चॅटर्जी यांना फोन केला व त्यांना बँकेचे क्रेडिट कार्ड ॲक्टीव्हेट करण्याचा बहाणा केला. त्यावेळी आरोपींनी चॅटर्जी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या क्रेडीट कार्डाचा व्हेरिफिकेशन कोड घेतला.
 
त्यानंतर वारंवार बँकेचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉग इन व लॉग आऊट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे चॅटर्जी यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशनचा वापर केला असता अज्ञात फोनधारकांनी चॅटर्जी यांच्या बँकेच्या खात्यातून 4 लाख 63 हजार 480 रुपयांची रक्कम काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर चॅटर्जी यांनी सायबर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.






Edited by- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत एमव्हीएला बहुमत मिळेल', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments