Marathi Biodata Maker

वडाळा-पाथर्डी रोडवरील चार कॉफी शॉप्स उद्ध्वस्त, अंधाऱ्या खोल्यांत कापडी कंपार्टमेंट बनवून लावले होते पडदे

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (21:01 IST)
नाशिक  कुठलाही परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून मुलामुलींना अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चार कॉफी शॉप्सचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलीस शिपाई मुश्रीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी अमोल लहू पिंगळे (वय 30, रा. उत्तमनगर, सिडको), अनिकेत सोमनाथ अहिरे (वय 21, रा. पंडितनगर, सिडको), विवेक प्रवीण सोनजे (वय 22, रा. साहिल अपार्टमेंट, उंटवाडी, नाशिक) व दिनेश प्रभाकर जावरे (वय 28, रा. आशीर्वाद अपार्टमेंट, उत्तमनगर) यांनी
 
ब्लॅकस्पून कॅफे (बापू बंगला), टोकियो कॅफे, ब्लॅकस्पून कॅफे व दक्ष इम्पिरिया यांनी वडाळा-पाथर्डी रोडवरील सराफनगर येथे कॉफी शॉप सुरू केले; मात्र कुठलाही परवाना नसताना चारही आरोपींनी कॉफी शॉपचा बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्यांत कापडी कंपार्टमेंट बनवून पडदे लावले व त्यात मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची तक्रार इंदिरानगर पोलिसांकडे दाखल होताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन चारही विनापरवाना कॉफी शॉप्सवर छापा टाकून कारवाई केली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

नगरसेवकाचा मुलगा तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होता, दक्षिण गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची पडताळणी होणार; बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

साताऱ्यात लोकशाहीची हत्या; मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप

Jyotiba Temple Viral Video पुजाऱ्यांकडून भक्तांना लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण; महाराष्ट्रात मंदिरातील धक्कादायक व्हिडिओ

पुढील लेख