Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू

Four members of the same family died on the spot in a horrific car accident
, गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (14:23 IST)
जळगाव- एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची बातमी आहे.  ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. 
 
या अपघातात विजयसिंग हरी परदेशी (65), तुषार उर्फ जयदीप मदन सिंग परदेशी (37), चतरसिंग पदम सिंग परदेशी (40) आणि आबा रामचंद्र पाटील (55) अशी मृतांची नावे आहेत. तसंच रायसिंग पद्मसिंग राजपूत (37) हा अपघातात गंभीर जखमी झाले आहे.
 
परदेशी कुटुंबीय बुधवारी कारने एरंडोलकडून जळगावकडे जात असताना भरधाव कारने पिंपळकोठ्याजवळ रस्त्यालगत उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चालक चतरसिंग परदेशी, विजयसिंग परदेशी, जयदीप मदनसिंग परदेशी व आबा पाटील हे चौघे जागीच ठार झाले, तर रायसिंग पदमसिंग राजपूत हे थोडक्यात बचावले असून जखमी झाले. त्यांना पुढील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात 7 ठार, लुहान्स्क भागातील 2 शहरे ताब्यात