सातारा जिल्ह्यात कराड- ढेबेवाडी मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या पोलिसांच्या वाहनाने रस्त्याच्या कडेवरून चालणाऱ्या चौघांना उडवल्याची घटना घडली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हा अपघात रविवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास कराड -ढेबेवाडी मार्गावर घडला. चार जण रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत असताना कोळेवाडी कडून ढेबेवाडीच्या दिशेने वेगाने निघालेल्या पोलिसांच्या वाहनाने या तरुणांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती. की या मध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. सुजल कांबळे असे या मयत तरुणाचं नाव असून हा कोळेवाडीचा राहणारा होता.
पोलिसांच्या वाहनाच्या चालकाने मद्यपान केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.