Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल
, शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (08:35 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अमरावतीच्या चांदूर रेल्वेत फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने ही तक्रार दाखल केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला वचननामा जाहीर केला होता. या वचननाम्यात आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. तसेच एकही वचन खोटं ठरणार नाही, असं जाहीरनामा प्रसिद्धीदरम्यान सांगितलं होतं.
 
घरगुती वापरातील वीज 300 युनिट पर्यंत 30 टक्क्यांनी दर कमी करणार असल्याचे शिवसेनेच्या वचननाम्यात असताना प्रत्यक्षात सदर वचन पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत आम आदमी पार्टीने पोलीसांत तक्रार दिली.
 
निवडणुकीपूर्वी 300 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर 30 टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या 56 उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे त्यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती. परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केली आहे असं म्हटल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात पाच रुग्णालयांत 'पोस्ट कोविड ओपीडी' सुरु होणार