Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बँकेची अधिकारी बनून महिले कडून 54 कोटी रुपयांची फसवणूक

बँकेची अधिकारी बनून महिले कडून 54 कोटी रुपयांची फसवणूक
, मंगळवार, 11 जून 2024 (16:54 IST)
सध्या फोन कॉल वरून फसवणूक होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. मोठ्या बँकेची अधिकारी असल्याचे सांगून एका महिलेने मुंबई महानगर प्रदेश लोह आणि पोलाद बाजार समितीची 54 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवी मुंबई पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
सदर घटना जून 2022 मध्ये पनवेल मध्ये एका महिलेने स्वतःला एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकची व्यवस्थापक असल्याचे संगितले नंतर महिलेने समितीच्या सदस्य आणि अधिकाऱ्यांशी ओळख करून संपर्क साधला नंतर तिने त्यांना वाढीव व्याजदराचे अश्वासःन दिले तिने बनावट कागद्पत्रासह कोटेशन पाठवले. महिलेने समितीला मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले.

समितीच्या सदस्यांनी 54.28 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले आहे. या गुंतवणुकीच्या बनावट पावत्याही महिलेने दिल्या होत्या. मात्र, ठेवीची मुदत संपल्यानंतर पैसे आणि व्याज परत करण्याची मागणी समितीने केली असता महिलेने टाळाटाळ सुरू केली आणि पैसेही परत केले नाहीत. महिलेने बँकेच्या कोषागार आणि गुंतवणूक विभागाने जारी केलेले बनावट पत्र देखील सादर केले ज्यामध्ये पैसे परत करण्यासाठी आणखी वेळ मागितला गेला. 

समितीच्या सदस्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांत तक्रार केळी असून पोलिसांनी सोमवारी कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायकलची सैर