Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गडचिरोली जिल्ह्यात वाघाची शिकार

tiger
, शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (08:07 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागातील अंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 615 मध्ये 30 डिसेंबर 2021 रोजी गस्तीवर असलेले वनरक्षक कैलाश परचाके, अतुल कातलाम, वनपाल नरेंद्र वड्डेटीवार यांना ओढयालगत दुगंधी येत असल्याने सदर दिशेनी ते गेले असता ओढयाच्या पात्रात रेतीवर वाडलेल्या वृक्षाची फांदी ठेवली होती व त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर माशा बसलेल्या दिसल्या. सदर बाब त्यांनी उपविभागीय वन अधिकारी, आलापल्ली नितेश शंकर देवगडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी अहेरी व आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन मोका स्थळावर दाखल झाले. सदर बाब अहेरीचे पोलीस निरिक्षक श्याम गव्हाने व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे यांना कळविले. व मोक्यावर पाचरण केले.
 
National Tiger Conservation Authority यांच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने मोक्यावरती असलेली फांदी बाजुला करुन रेतीत पुरुन असलेले शव बाहेर काढण्याची कार्यवाही केली असता सदर शव हे वाघाचे असल्याचे दिसुन आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे, डॉ. पवन पावळे, डॉ. ज्ञानेवश्वर गव्हाने यांच्या पॅनलने सदर वाघाच्या शवाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या वेळेस आशिष पांडे भारतीय वनसेवा, उदय पटेल वन्यजीव मानद रक्षक तथा NTCA प्रतिनिधी, लक्ष्मण कन्नाके सरपंच देवलमरी, श्रीनिवास राऊत, अध्यक्ष स.व.स मोसम, जगन्नाथ मडावी, माजी उपसंरपच देवलमरी, दिपक वाढरे निर्सग सखा संस्था (NGO) गोडपिंपरी हे उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रतीक्षा संपली! Kia Carens साठी बुकिंग या दिवशी सुरू होईल, Alcazar आणि Safari शी स्पर्धा करेल