Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्पाची ओढ सातासमुद्रापार; अहमदनगरच्या गणपती बाप्पाची थेट परदेशवारी, थायलंडच्या गणेश मंदिरात होणार स्थापना

ganesha idol
, शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (21:27 IST)
अहमदनगर : लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रातील सर्वच गणपती कारखान्यामध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. गणेशभक्तांना गणपती आगमनाचे वेध लागले असून जसा गणेशोत्सव महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसाच काहीसा परदेशातही गणपती आगमनाचा उत्साह असतो.अशातच श्रीगोंदा येथील गणेश मूर्तींची 'क्रेझ' थेट थायलंडमध्येही वाढली असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मोठी मागणी केली जात आहे.
 
बाप्पाचे आगमन काही दिवसांवर आले आहे  त्यामुळे गणेश मूर्ती कारखान्यात मूर्तीकार बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गणेश मूर्ती कारखान्यातही लगबग वाढली आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश गणेश मूर्ती विक्रीसाठीसाठी देखील बाजार आलेल्या आहेत. येथील गणेश मूर्तीचे विशेष राज्यासह परदेशातून या मूर्तीना मागणी असते. श्रीगोंद्यातील कलाकार अनुजित दिवटे यांच्या संकल्पनेतून 'दगडूशेठ हलवाई'  आणि 'लालबागचा राजा' यांची युनिक प्रतिकृती असलेल्या 500 पेक्षा जास्त गणेशमूर्ती थायलंडला रवाना झाल्या आहेत.
 
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून यावर्षी श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात 10 ते 12 हजार लक्षवेधी गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, फायबरपासून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. यातून 70 ते 80 लाखांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
 
श्रीगोंद्यात दिवटे यांचा गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय तीन पिढ्यांपासून सुरु आहे. त्यांचे वडील केशव दिवटे हे वकील व्यवसाय सांभाळून हा व्यवसाय करायचे. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्ती बनवायचे, मात्र त्यांच्या मुलांने मुंबई येथे जे. जे. आर्टस् स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि पारंपरिक मूर्ती बनवण्यापेक्षा युनिक मूर्ती बनवण्याचे धोरण घेतले.
 
यंदा थायलंडला मूर्ती रवाना
दरम्यान राज्यासह देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातोच, शिवाय परदेशात देखील गणपती उत्सव साजरा केला जातो. याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ डोळ्यांसमोर ठेवून दिवटे यांनी गणेशमूर्ती तयार केल्या आहेच. यंदा थायलंड येथील गणेश मंदिरात अनुजित यांच्या हाताने साकारलेली गणेशमूर्ती बसवण्यात येणार आहे.

या मूर्तीची किंमत आठ लाख रुपये इतकी असल्याचे ते म्हणाले आहेत. अनुजित यांनी बनवलेल्या 'दगडूशेठ हलवाई' आणि 'लालबागचा राजा' यांची प्रतिकृती असलेल्या 18 आणि 24 इंचाची मूर्ती थायलंडसाठी बनवल्या आहेत. मूर्तीची किंमत दोन ते अडीच हजार आहे. मात्र अलंकार वस्त्रासह एका गणेशमूर्तीची किंमत 12 ते 15 हजारांच्या घरात जाते.
 
श्रीगोंदा येथील कुंभारवाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरु आहे. अगदी सहा इंचापासून ते सात फुटांपर्यंत इथे मूर्ती बनवल्या जातात. शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, फायबरपासून गणेशमूर्ती इथे उपलब्ध आहेत. आता परदेशातूनही या मूर्तीला मागणी वाढत असल्याने श्रीगोंद्याचा नावलौकिक सातासमुद्रापार गेला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपवर ईडीचे छापे; 14 बॉलिवूडकर रडारवर, नेमकं प्रकरण काय?