Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुख्यात गजा मारणेचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (07:46 IST)
कुख्यात गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी तो तळोजा कारागृहातून सूटल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढली. त्यानंतर काही वेळातच जंगी मिरवणूकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. आता गजा मारणेविरूध्द पुणे ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून त्याला एक फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे.
 
शनिवारी सातारा जिल्हयात मेढा पोलिसांनी त्याला अटक केली. डस्टर गाडीतून फिरणार्‍या गजाच्या मुसक्या आवळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि त्याच्यावर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. त्यापुर्वी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबाहेर गजा मारणेचा खाली बसलेला फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या प्रमाणे त्याच्या जंगी मिरवणूकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्याच पध्दतीने त्याचा हा फोटो देखील व्हायरल होतो आहे. थाटा-माटात पुण्यात रॉयल एन्ट्री मारणार्‍या गजा मारणेचा आता हा फोटो व्हायरल होत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर पोलिसांनी तुर्तास गजा मारणेवर कारवाई करून त्यास अद्दल घडवली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'वरात' म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवारांची टीका

LIVE: 'आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...', सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'बारात' म्हणणाऱ्या संजय राऊतांना शरद पवारांचा सल्ला

महिलांना आकर्षित करण्यासाठी Indian Air Force चा अधिकारी असल्याचा सांगायचा, पुण्यात तोतया जवानाला अटक

पुढील लेख
Show comments