Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात’, प्रवीण दरेकरांचा सचिन सावंत यांच्यावर हल्लाबोल

Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (07:39 IST)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण प्रचंड तापलं. हा वाद आता राज्य सरकार विरुद्ध विरोधी पक्ष असा निर्माण झालाय. त्यातच, दोहोंकडूनही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच, राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना टोला लगावला आहे. “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल,” असं दरेकर म्हणाले.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. मात्र, भेटीसाठी वेळ न दिल्यानं राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला आव्हान दिलं. “कंगना राणावतला भेटणारे पंतप्रधान छत्रपती संभाजी राजेंना का भेटत नाहीत? या साध्या प्रश्नाचे उत्तर प्रविण दरेकरांना व भाजपाला देता येत नाही. असो! उद्या पुन्हा मी भाजपाची पोलखोल करुन मराठा आरक्षणाविरुध्द भाजपाचा कुटील डाव उघड करणार आहे. त्याही प्रश्नापासून पळ काढतात का? ते पाहू,” असं सावंत म्हणाले होते.
 
सावंत यांनी दिलेल्या आव्हानाला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. दरेकर यांनी ट्विट केलं असून, शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. “ज्यांच्यासाठी बाजू मांडताय, त्यांची आता एव्हढी लाज निघालीय ना मराठा आरक्षणाबाबत सचिन सावंतजी, थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल. ‘पोलखोल’ च्या नादात स्वपक्षाची आणि महाविकास आघाडीचीच लक्तरं तुम्ही वेशीवर टांगत आहात!,” असं दरेकर म्हणाले.
 
“बाकी विषय भरकटवण्यात तुम्ही, काँगेस आणि तुमचे सहकारी पक्ष यांचा हात कुणी धरू शकणार नाही. भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या. राहता राहिला प्रश्न ‘पोलखोलचा’ तर… महाविकास आघाडीचा मराठा आरक्षण न देण्याचा ‘नियोजनबद्ध दुर्लक्षपणाचा बुरखा’ आपल्या पोलखोलीनंतर मराठा बांधव आणि महाराष्ट्रासमोर आम्हीच टराटरा फाडू!,” असा इशाराही प्रविण दरेकर यांनी सचिन सावंत यांना दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 14कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले

पाकिस्तानशी फक्त दहशतवाद आणि पीओके रिकामे करण्यावर चर्चा होईल,परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले

राज्याला विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी रोडमॅप तयार केला, शतक पूर्ण केले

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments