Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर विधीमंडळाचे सभागृह चालू देणार नाही, प्रविण दरेकर यांचा इशारा

Webdunia
मराठा समाजाच्या उमेदवारांना शासनाच्या अधिनियमातील कलम 18 नुसार नियुक्ती देण्यात यावी. यासाठी हा विषय विधीमंडळात मांडण्यात येईल. मात्र, तरीही या प्रश्नाला सरकारने न्याय मिळवून दिला नाही, तर विधीमंडळाचे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. सकल मराठा समाज महाराष्ट्रच्यावतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी  आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली.
 
प्रविण दरेकर यांनी मराठा समाजाच्या सुमारे 3500 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली. ते म्हणाले, “आमच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या अधिनियमानुसार या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतू विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचादरम्यान काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ‘खो’ घातला. तसेच हा विषय न्यायालयात योग्य पध्दतीने मांडला नाही. त्यामुळे या मराठा समाजाच्या या उमेदवारांवर अन्याय झाला.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

महाराष्ट्रात सरकार बदलणे गरजेचे म्हणत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments