Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणुसकी ओशाळली : रुग्णालयातून लांबवली मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत !

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (09:24 IST)
नाशिक शहरातील एका रुग्णालयात माणुकीसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मृत महिला रुग्णाच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत चोरी झाल्याचा आरोप तिच्या मुलाने केला आहे. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने तपास कामात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
 
याबाबत गौरव शिंदे यांनी नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
 
उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
 
ही बाब गौरव यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितली.हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव ही फिर्याद दिली. हॉस्पिटलचे संचालक राजेश यादव म्हणाले, चोरीची घटना घडली असेल तर ती दुर्दैवी आहे.मात्र, त्यातील दोषी सुटणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. पोलिसांना सर्व सहकार्य आहे अस हॉस्पिटलकडून सांगण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये भीषण आग, 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत एमव्हीएला बहुमत मिळेल', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'बटंगे तो कटेंगेचा नारा इथे चालणार नाही- अजित पवारांचे प्रत्युत्तर

PAK vs AUS: पाकिस्तानने शेवटची वनडे आठ गडी राखून जिंकली,ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

पुढील लेख
Show comments