राज्यात सरकारी विभागांमध्ये ७५ हजार रोजगार निर्मिती करणार असल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज ते मुंबईत बोलत होते.
हजारो पदं रिक्त असतात. त्यामुळे तरुणांमध्ये निराशा निर्माण होते. मोदींनी ही परिस्थिती बदलायची ठरवली आहे. केंद्र सरकारच्या वतीने विविध विभागांमध्ये १० लाख तरुणाईला रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पूर्ण होत असताना ७५ हजार तरुण तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलं. येत्या काही दिवसांत १० लाख तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. हा रेकॉर्ड आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात याआधी कधीही मोठी भरती झाली नाही. तो निर्णय मोदींनी घेतला, असे कौतुकोद्गार फडणवीसांनी उद्गारले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मिळून हा निर्णय घेतला की राज्यावरील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी दूर केली पाहिजे. राज्यात ७५ हजार नोकरीचं उद्दीष्ट पूर्ण करण्याचं आमचं उद्दीष्ट्य आहे. तसंच, खासगी क्षेत्र महाराष्ट्रात मोठं आहे. खासगी क्षेत्रातही बऱ्याच संधी आहेत. महाराष्ट्रातील उद्योजकांना विचारलं तर योग्य उमेदवार मिळत नाही असं ते सांगतात. त्यामुळे रोजगार देणारे आणि रोजगार घेणारे यांना एकत्र आणण्यासाठी रोजगार मेळावा आयोजित करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
Edited By- Ratnadeep Ranshoor