Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गोविंद पानसरे खूनखटला; सुनावणी ५ ऑगस्ट रोजी

govind pansare
, बुधवार, 27 जुलै 2022 (22:12 IST)
कोल्हापूर – ज्येष्ठ विचारवंत गोवेंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व नऊ संशयितांना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच दोषारोप निश्चिती होणार आहे.
 
ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी गोळया झाडून खून करण्यात आला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात या खूनाचा गुन्हा नोंद होऊन तपास सुरु आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने अटक असलेल्या सर्व संशयितांना हजर करण्याचे आदेश दिले होते. यामुळे बुधवारी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे,शरद कळसकर,समीर गायकवाड यांना हजर करण्यात आले. मात्र बेंगलोर येथील सहा संशयितांना आदेशाची प्रत वेळेत न मिळाल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता