Gram Panchayat Elections : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली असून या टप्प्यात 7 हजार पेक्षा अधिक ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया होणार असून मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 7 नोव्हेंबर 2022 रोजी परिपत्रक जाहीर केले असून आचार संहिता लागू केली आहे. परिपत्रकात ग्राम पंचायत निवडणूक कशी घ्यावी हे सांगण्यात आले असून. हे परिपत्रक प्रत्येक जिल्ह्याला पाठविण्यात आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणुकांसाठी कसे असावे या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक असलेल्या ग्राम पंचायतच्या जवळच्या गावांमध्ये देखील आचार संहिता लागू असेल असे आदेश देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून स्वतंत्ररित्या निवडणूक कार्यक्रम येईल.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुका आहे. त्या जिल्ह्यात आणि तालुक्यात आचार संहिता लागू असणार. राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीच्या पहिला टप्प्यात तब्बल 7600 ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडला होता. आता दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर, नांदेड, सांगली, अकोला, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, गडचिरोली, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, गोंदिया, जळगाव, नागपूर, जालना, नंदुरबार, लातूर, पालघर, उस्मानाबाद, परभणी, सातारा, पुणे, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि नाशिक हे ग्राम पंचायत आहे.