Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घराचा स्लॅब कोसळून आजोबा व नातू ठार

Webdunia
शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (07:55 IST)
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथे घराचा स्लॅब कोसळून आजोबा व नातू ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत ग्रामस्थ अन प्रशासनाने वेळीच मदत कार्य राबवत आजीला सुखरूप बाहेर काढले. नळवाडपाडा शिवारातील वस्तीवर एका बंद कंपनीच्या जुन्या खोलीत झोपलेले गुलाब वामन खरे (आजोबा) विठा बाई गुलाब खरे, निशांत विशाल खरे (नातू )रा. नळवाडी हे सदर खोलीचे छत स्लब व भिंत कोसळून दाबले गेले. यात आजोबा गुलाब खरे व निशांत खरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत ग्रामस्थ अन प्रशासनाने वेळीच मदत कार्य राबवत आजीला सुखरूप बाहेर काढले.
 
पहाटे पासून तालुक्यात पाऊस सुरू असून दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या असून त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे खरे हे रात्री नेहमी सदर खोलीत पत्नी व नातू समवेत राहत होते गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळत त्याखाली ते दाबले गेले. शेजारी त्यांचे मुलाला आवाज येताच त्यांनी तेथे बघितले असता त्यांना आई वडील मुलगा छता खाली दाबल्याचे दिसून आले.
 
या घटनेनंतर त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित व ग्रामस्थांना कळवले सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली. .जेसीबी बोलवण्यात आले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले पहाटे चार च्या सुमारास सरपंच हिरामण गावित,शिपाई बाळू गवळी व ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा व नातू मयत झाले होते. तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments