शहर आणि ग्रामीण भागातील खुली पर्यटनस्थळं बंद करणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.खुली मैदानं आणि अन्य ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी मुभा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. रामकुंडावर भाविकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता कोरोना आढावा बैठक संपन्न झाली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. नाशिकसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. मास्कही वापरला जात नाही. याबाबत गेल्या कोरोना आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली होती. नियम पाळा अन्यथा समिती बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागतील, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. पण, या बैठकीत त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र बाजार समिती प्रशासनाला मात्र या सुचना देण्यात आल्या. बाजारसमित्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतोय, अशी शक्यता आहे. बाजारसमिती प्रशासनाला गर्दी आटोक्यात आणाव्या. गर्दी होणार नाही याची बाजार समिती त्यांनी काळजी घ्यावी.
या आढावा बैठकीत भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात सध्या ७८२४ सक्रिय रूग्ण आहे. दररोज मोठ्या संख्येने रूग्ण वाढत आहेत.सर्वाधिक ६०८८ रूग्ण एकट्या नाशिक शहरात आहे. आत्तापर्यंत ४४.७२ लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला ( ८६ टक्के )आत्तापर्यंत २६ लाख लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. आत्तापर्यंत १४ हजार ८९ लोकांनी बुस्टर डोस घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आॅक्सिजन बाबत बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्यासाठी ४०२ मेट्रिक टन ऑक्सिजनचं उद्दिष्ट आहे. सध्या आपली क्षमता 486 मेट्रिक टन, आणखी १७७ मेट्रिक टन ऑक्सिजनसाठी प्रयत्न सुरु आहेत. ३८३ मेट्रिक टन ऑक्सिजन भरून ठेवला आहे. यावेळी त्यांनीकोविडनं मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्यात येत आहे. पोर्टलवर १२ हजार ४४७ जणांचे मदतीसाठी अर्जत्यापैकी छाननी करून ५ हजार ३६६ जणांना मदतीसाठी मान्यता, हळूहळू पैसे मिळणार आहे.
यावेळी मालेगाव पॅटर्न बाबत बोलतांना ते म्हणाले की, पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावची रूग्णसंख्या आता अतिशय कमी आहे. मालेगावच्या कोरोनामुक्तीच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांकडून काम सुरु आहे. मालेगाव कोरोनामुक्ती पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी आत्तापर्यंत ६६७ नागरिकांचे सॅम्पल घेतले
इंपेरिकल डाटाबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, ज्या ज्या मार्गाने इंपेरिकल डाटा गोळा होईल त्या मार्गाने गोळा करण्याचं काम सुरु आहे. ओबीसी आरक्षणाबाबत १७ जानेवारीला कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोर्टात आपण जो अध्यादेश काढला त्याचा बेस काय आहे हे न्यायालय पटवून देणार आहोत. यावेळी त्यांनी अंजली दमानिया बाबतही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कुणी कोर्टात गेलं, तरी त्याची चिंता करण्याचं कारण नाही, ऍक्टिविस्ट आहेत, कुणीही कोर्टात जाऊ शकत. त्यावर अधिक भाष्य करणार नाही.