Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण

Webdunia
दुर्गराज रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणाऱ्या तब्बल 22 गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या वतीने रायगडच्या गाईड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे.
 
किल्ले रायगडावरील एकूण 22 गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, शौर्य, कीर्तीची महती सांगत असतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत स्वराज्याचा पराक्रमी इतिहास रोज सांगत असतात. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून रायगड पाच पुष्पहार 2021 पासून सुरू आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण. यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेश झोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप अवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशा एकूण 22 गाईड लोकांचा समावेश आहे. वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. 2 जून रोजी 350 व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्य विमा संरक्षण पत्र सर्व गाईड लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

LIVE: मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून खंडणी मागितली,आरोपीला अटक

RCB vs KKR : पावसामुळे टॉस न करता सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

मंत्री छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाकडून खंडणी मागितली,आरोपीला अटक

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments