Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुलियन-बॅरे सिंड्रोम देशभर पसरला आहे! महाराष्ट्रानंतर आता या राज्यात एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 30 जानेवारी 2025 (21:26 IST)
Guillain-Barre Syndrome News: देशात गुलियन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढत आहे. महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगालमध्ये एका 17 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आज याबाबत एक बैठक झाली आणि यावेळी राज्यातील सर्व सरकारी आणि जिल्हा रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या.
ALSO READ: ठाण्यात एटीएसची कारवाई, 4 बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार देशात गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे आणि दररोज नवीन प्रकरणे नोंदवली जात आहे. गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे देशातील हा तिसरा मृत्यू आहे. आजच्या सुरुवातीला, महाराष्ट्रातील पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू झाला. आता पश्चिम बंगाल आरोग्य विभागाने राज्यात आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. कोलकाता येथील एका 10 वर्षाच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील १२ वीच्या विद्यार्थ्याचा कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्याचा मृत्यू सेप्टिक शॉक आणि मायोकार्डिटिसमुळे झाला आणि डॉक्टरांना संशय आहे की हा आजार गुलियन-बॅरे सिंड्रोम असू शकतो.
ALSO READ: अमेरिकेत भीषण अपघात : हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या सैनिकांसह 67 जणांचा मृत्यू
तसेच आतापर्यंत या सिंड्रोमचे 127 रुग्ण आढळले आहेत आणि सतत वाढत्या संख्येमुळे 200 रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) बाबत एक बैठक घेतली. ज्यामध्ये आरोग्य सचिव आणि इतर अधिकारी देखील सहभागी झाले होते. बैठकीत, राज्यातील सर्व सरकारी आणि जिल्हा रुग्णालयांना जीबीएसचा कोणताही रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाला तात्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले.

Edited By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

शिवसेनेने (यूबीटी) सर्वपक्षीय शिष्टमंडळांना पाठिंबा दिला, रिजिजू यांनी उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा केली

LIVE: गडचिरोली पोलिसांनी ५ महिला नक्षलवाद्यांना अटक केली

गडचिरोली पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली, घातक शस्त्रे जप्त

प्लेऑफपुर्वी मुंबईच्या टीममध्ये 3 बदल

छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले....

पुढील लेख
Show comments