रक्षाबंधनासाठी घराबाहून बाहेर पडलेल्या आणि रस्तेच्या कडेला उभ्या असलेल्या त्या कुटुंबाला हे माहित नहव्ते की त्यांच्या काळ त्यांचा जवळ येत आहे. भरधाव बसच्या रूपाने काळ आला आणि काहीच क्षणातच त्याबसने संपूर्ण कुटुंबाला उडवलं. पण नशीब बलवत्तर म्हणून हे सर्व लोक सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. हे थरकाप आणणारे भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा धक्कादायक अपघात गुजरातच्या गोधरा-वडोदरा हायवेवर कोठी चौकाजवळ झाला आहे.
तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. सध्या या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @iamVadodara ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक कुटुंब रस्त्याच्या किनाऱ्यावर उभं आहे. गाडीची प्रतीक्षा करत आहे. सुरुवातीला त्यांच्या समोरून रिक्षा, कार गेली. त्यानंतर अचानक एक भऱधाव वेगाने बस आली. कुटुंब तसं रस्त्याच्या कडेलाच होतं. भरधाव बसला पाहून ते आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला पळू लागले. पण काही क्षणातच बस त्यांच्यावर आली. बसने संपूर्ण कुटुंबाला उडवलं.
काही तर या बस सोबत उडाले तर काही बस पासून थोड्या अंतरावर फेकले गेले. सुरुवातीला एक व्यक्ती बसच्या पुढच्या चाकासोबत उडाल्याचे दिसले. तर दोन लहान मुलं देखील बससोबत उडल्याचं दिसलं आहे. बसच्या मागे उडालेल्या लोकांनी उठून स्वतःला सावरून बस सोबत उडालेल्या सदस्यांच्या मदतीला धाव घेतली.