Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हसन मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला; ED कडे अधिकृत तक्रार करणार – किरीट सोमय्या

Hassan Mushrif swindled hundreds of crores; Will lodge an official complaint with ED - Kirit Somaiya Regional Marathi  News In Webdunia Marathi
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (15:34 IST)
महाविकास आघाडी सरकारला सतत धारेवर धरणारे भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी आणखी एका मंत्र्यावर आरोपांची तोफ सोडली आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या  नेत्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. 
 
मागील दोन दिवसापुर्वी किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं की, सोमवारी राष्ट्रवादीच्या एका आणि शिवसेनेच्या एका ऩेत्याचा भ्रष्टाचार उघड करणार आहे.यावरुन त्यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांच्यावरजोरदार आरोप केला आहे. मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत.फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग  करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पानाचे पुरावे आहेत.ते मी आयकर विभागाला दिले असल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे.मात्र त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव सांगितलं नाही.एकाचं प्रकरण मी सांगितले असे ते म्हणाले.
 
बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत.यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे.ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. पुढे ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये आयकर विभागाने  मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या.बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तारक मेहता का उल्टा चश्मा: 'बबिता जी'ने 'टप्पू'सोबत नात्याच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं