Dharma Sangrah

आर्मी भरतीची करत होता तयारी, अंगावर झाडाची फांदी पडून मृत्यू

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:10 IST)
सागंली जिल्ह्यातील मिरजेत पोलिसभरती व आर्मी भरतीच्या सराव करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर वडाच्या झाडाची फांदी पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. हर्षवर्धन विजय कदम (वय 20) असे या तरूणाचे नाव आहे.
 
मिरजेत सायंकाळी वादळी वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली होती. मिरज शासकीय रुग्णालयाच्या ग्राउंड वर पोलिसभरती व आर्मी भरतीच्या सराव करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर वडाच्या झाडाची फांदी पडून तरुण जागीच ठार झाला आहे.
 
नेहमी प्रमाणे मिरज शासकीय महाविद्यालय ग्राउंडवर भरतीचा सरावासाठी हर्षवर्धन गेला होता. वादळी वारा सुटून पावसाला सुरुवात झाल्याने वडाच्या झाडाखाली कंपाउंड भिंतीवर बसला होता यावेळी मोठी झाडाची फांदी हर्षवर्धन कदम यांच्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाला. हर्षवर्धनचा मृतदेह फांदी खाली अडल्याने त्याला बाहेर काढणे अश्यक्य झाले होते. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. कटरच्या साहाय्याने फांदी कट करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात बिबट्याच्या दहशतीला आळा घालण्यासाठी आपत्ती जाहीर करण्याचा प्रस्ताव व दोन ‘रेस्क्यू सेंटर’ लवकरच उभारणार- फडणवीस

LIVE: पुण्यातील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार निर्दोष मुक्त, इतर तिघांविरुद्ध कारवाई निश्चित

Local Body Elections भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बीएमडब्ल्यू कारने गर्भवती भारतीय महिलेला चिरडले

पंतप्रधान मोदी यांनी किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता जाहीर केला, म्हणाले-भारत सेंद्रिय शेतीचे जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर

पुढील लेख
Show comments