महाराष्ट्रात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींची माफी मागितली.परीक्षा चार दिवसांवर असतानाही अभ्यासक्रमाची कल्पना नाही.अनेकांचे प्रवेशपत्र अद्याप मिळाले नाहीत. प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ दिलेली नाही.
तसंच दोन पदांसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थींना दोन्ही परीक्षांना बसणं अशक्य होईल, अशा प्रकारे नियोजन करणं ही यामागची कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळून येत आहे.अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र परजिल्ह्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
अनेक जण परराज्यात परीक्षा केंद्र आपल्यामुळे वेळीच केंद्रावर पोहोचले आहे तर काही प्रवासात आहे. शासनाने घेतलेल्या अचानक या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप करीत आहे.परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबाबद्दल मी माफी मागतो,अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्य मंत्री म्हणाले ,की,'एका विद्यार्थ्यांचा हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकला होता,तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. या परीक्षेला आठ लाख विद्यार्थी बसणार असून योग्य नियोजनासाठी बाह्य स्रोत नेमला आहे.ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होण्यास काही अडचण येत आहे त्यांना ईमेल्स करण्यात येत आहे.अशी सर्व तयारी असून परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थीना त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे विद्यार्थी फार संतापले आहे.