आकाशवाणीमराठा आरक्षणाच्या याचिकांवर आता २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आरक्षणासंदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव सिन्हा आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्यासमोर एकत्रित सुनावणी झाली.
या याचिकांमधल्या त्रुटी आणि आक्षेप २२ जानेवारीपर्यंत दूर करण्याचे आदेश न्यायालयानं याचिकाकर्ते आणि निबंधकांना दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतलं मराठा आरक्षणही न्यायालयानं वैध ठरवलं आहे.