Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी

पश्चिम महाराष्ट्र
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढल्याने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने पालघरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.  
 
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणारे वाफयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातील सक्रिय हवामान प्रणालीमुळे कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येते २४ ते ४८ तास कोकण विभागासाठी खूप आव्हानात्मक असू शकतात. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने मच्छिमारांना ५ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा जोरदार सल्ला दिला आहे, कारण किनारपट्टीवर ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 
 
मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस
शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता असून, रात्री विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पालघरमध्ये मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने २ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
 
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग  या जिल्ह्यांमध्येही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी ते प्रचंड मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे शहर आणि आसपासच्या घाट परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, रात्री पावसाचा जोर किंचित कमी होईल. 
 
कोल्हापूर आणि सातारामध्ये  मान्सूनच्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
 
तसेच विदर्भ आणि मराठवाडा: यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भाची राजधानी नागपूरमध्ये आजपासून मान्सूनचा जोर वाढणार आहे. दिवस-रात्र मुसळधार पावसाची शक्यता राहील. तर वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे, जिथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
 
मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या बहुतांश भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई: चेंबूर स्कूल बस अपघातानंतर बीएमसीकडून मोठी कारवाई! तीन अधिकारी निलंबित