Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Weather Forecast : राज्यातील पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Forecast  News
, शनिवार, 18 जून 2022 (13:23 IST)
गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सून येणार अशी माहिती हवामान खात्यांकडून दिली आहे. मात्र अद्याप  महाराष्ट्रात मान्सून सक्रिय नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवरच थांबला आहे. राज्यातील काही भागात येत्या 3  दिवसांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 19  ते 21  जून या काळात राज्यातील 15  जिल्ह्याना यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये मान्सून पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यंदा मान्सून येण्यास विलंब झाला आहे तरीही  राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नाही आणि ढग तयार होण्यास वेळ लागत आहे त्यामुळे पावसाचे आगमन होत नाही. येत्या 19 जून पासून पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्यात पालघर , ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर , सातारा, अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर , वर्धा , बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम या 15जिल्ह्यात 'यलो' अलर्ट सांगण्यात आले आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशा प्रकारे साजरा करा फादर्स डे