Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार

Webdunia
गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:19 IST)

राज्य शासनाने हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार केलं आहे. केंद्रीय नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांवर आधारित धोरण तयार करण्यात आलं आहे. सरकारच्या या धोरणानुसार सर्व जिल्ह्यात कायमस्वरुपी हेलिपॅड उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या अपघातांनंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हेलिपॅड बांधण्यासाठी खुले मैदान, जिल्हा पोलीस परेड मैदान, एमआयडीसीतील मोकळी जागा यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हेलिपॅडची जागा सपाट, मजबूत, हलकेसे गवत असलेली असावी, त्या जागी दगड, डेब्रिज नसावे. हेलिपॅडसाठी निवडलेली जागा ५२ x ५२ मीटर पूर्णपणे मोकळी  असावी.  हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागेवर हेलिकॉप्टरपासून २४५ मीटर आणि हेलिपॅडपासून ५०० मीटर परिघात कोणताही अडथळा नसावा. हेलिपॅडच्या परिसरात वीज वाहिन्या, डाटा-टेलिफोन केबल, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर अशा कुठलेही उड्डाणात अडथळा आणणारे घटक नसावेत. मानवी वस्त्यांपासून हेलिपॅडची जागा दूर असावी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments