Dharma Sangrah

पुण्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू

Webdunia
वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच आजपासून पुण्यात दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे हेल्मेट सक्तीला हेल्मेट विरोधी कृती समितीकडून विरोध करण्यात आला आहे. 
 
पुण्यातील वाहतूक समस्या तसेच गंभीर स्वरुपाच्या अपघातांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नोव्हेंबर महिन्यात शहरात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला होता. हेल्मेट वापरल्यास गंभीर स्वरुपाच्या अपघातातील जीवितहानीचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. १ जानेवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी म्हटले होते.  यानुसार आजपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.
 
‘हेल्मेट परिधान केल्याने गंभीर स्वरुपाची दुखापत टाळता येते. आगामी वर्षांत रस्ते अपघात कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार असून दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना नाशिकहून मुंबईला विशेष विमानाने आणले

२०२९ पर्यंत उद्धव यांचा पक्ष संपेल ,शिवसेना नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली

IND vs AFG: अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीला आयसीसीने दंड ठोठावला

भारत पुरुष हॉकी संघ आणि पाकिस्तान पुरुष हॉकी संघ यांच्यात हाय-व्होल्टेज लढत, ४ दिवसांत दोन सामने, तारीख आणि वेळ जाणून घ्या

LIVE: विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर रासायनिक लेपन करण्यावर बंदी

पुढील लेख
Show comments