Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांची सुटका तर एका तरुणीला अटक

Webdunia
सोमवार, 29 मार्च 2021 (16:16 IST)
पिंपरीत  मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणा-या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी 5 पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून एका तरुणीला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 5 हजार 650 रुपये रोख रक्कम 9 हजारांचा मोबाईल फोन असा एकूण 14 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बालेवाडी- हिंजवडी रस्त्यावर वाकड येथील भुजबळ चौकात ही कारवाई केली.
 
केतकी विजय खरात (वय 21, रा. जुनी सांगवी), असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर संभाजी मोरडे (वय 40 रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे उपनिरीक्षक धैर्यशील सोळुंके यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे द ॲड्रेस कमर्शिया या मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या गोल्डन रिलॅक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत 5 पीडित महिलांची सुटका केली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, उपनिरीक्षक प्रदीप सिसोदे, धैर्यशील सोळंके, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सोनाली माने आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मीराबाई चानूची कारकीर्द संपलेली नाही, प्रशिक्षकाने दिले मोठे वक्तव्य

पुण्यात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानाच्या हस्ते आज उदघाटन

पुण्यात कामाच्या ताणामुळे सी ए तरुणीचा दुर्देवी मृत्यू

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हंटर बायडेनला बंदुकीप्रकरणी 4 डिसेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार

पुढील लेख