Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकात भारतीय संघाच्या विजयाचा आंनद करण्यासाठी केलेल्या आतिषबाजीमुळे घराला आग

fire
, सोमवार, 10 मार्च 2025 (17:17 IST)
नाशिक शहरात आयसीसी चॅम्पियन्स ट्राफीच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट  संघाचा विजयाचा आनंद देशभरात साजरा करण्यात आला. नाशिकात रस्त्यावर करत असलेल्या अतिशबाजीची ठिणगी एका घरात पडली आणि घराला आग लागली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास कॉलेज रोड परिसरात ही घटना घडली. 
 घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सुमारे 30 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. या वेळी  रस्त्यावर सुमारे 4 हजार लोक आनंद साजरा करण्यासाठी जमले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण झाली.
अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमनदलाचे जवान आग विझवताना जमलेल्या काही तरुण अग्निशमन दलाच्या वाहनावर चढून त्यावर नाचू लागले. पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जन हानी झाली नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वानुआतुच्या पंतप्रधानांनी ललित मोदींचे पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले