Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर शहरात तुफान राडा ! ‘या’ पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना मारहाण !

Webdunia
शनिवार, 3 जुलै 2021 (08:32 IST)
अहमदनगर महापालिकेच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर तुफान हाणामारी झाली आहे.भाजपाचे काही कार्यकर्ते आणि लसीकरण केंद्रावरील पदाधिकार्‍यांमध्ये वादावादी होवून ही हाणामारी झाली असल्याची माहिती समजली आहे.महानगरपालिकेच्या सावेडी लसीकरण केंद्रावर भाजप पदाधिकारी आणि लसीकरणसाठी उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री उडाली.
 
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा महापालिकेचे नगरसेवक भय्या गंधे व त्यांच्या मुलांना धक्काबुक्की करत मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. . या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.घटनेनंतर सावेडी केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लसीकरणातील वशिलेबाजीवरून हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. मनपाच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध होते.
एका खासगी कंपनीतील कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांना लसीकरण केंद्रावर घेवून आले होते.लसीकरणावरून त्यांच्यात प्रथम वादावादी झाली व त्यांनतर त्यांच्यात हाणामारी झाली असल्याची माहिती समजली आहे. हाणामारी झाल्यानंतर हे प्रकरण तोफखाना पोलिस ठाण्यात पोहोचले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments