Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा बायकोच्या भांडणात १० घरे जाळून खाक ! लाखोंची हानी आणि कुटूंबे बेघर महाराष्ट्रातील घटना

Husband and wife quarrel
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:11 IST)
पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन तिला शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत असल्याने पत्नी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असल्याचा राग मनात धरून मद्य प्राशन केलेल्या पतीने स्वत:चे घर पेटवून दिले.लागलेल्या आगीत दहा कुटूंबे राहत असलेला जुना पाटील वाडा जळून खाक झाल्याची घटना माजगाव, ता. पाटण येथे घडली होती. या जळीत प्रकरणी संजय रामचंद्र पाटील रा.माजगाव ता.पाटण याच्यावर मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस पाटील सागर जयसिंग चव्हाण रा.चाफळ ता.पाटण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माजगाव येथील पाटीलवाडा येथे संशयित संजय पाटील याच्या घरात आग लागली होती. त्यावेळी गावातील लोकांची बरीच गर्दी झाली होती. त्यावेळी गावातील लोकांकडे फिर्यादी यांनी चौकशी केली असता,संशयित संजय पाटील याने दारु पिवून येऊन त्याच्या पत्नीवर चारीत्र्याच्या संशयावरुन तिला शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत असल्याने पती विरोधात मल्हारपेठ पोलिस ठाण्यात पत्नी तक्रार देण्यासाठी गेली असता, संशयित संजय पाटील याने चिडून दारुच्या नशेत रहाते घराला आग लावून घर पेटवून दिले.

या दरम्यान, संशयित हा पेटलेल्या घरातच होता. यावेळी काही नागरिकांनी गावातील पेटलेल्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना बाहेर येत नव्हता यावेळी लोकांनी संशयितांस बाहेर काढले. सदर लागलेल्या आगीमध्ये पाटील वाड्यातील पांडुरंग महादेव पाटील, दतात्रय मारुती पाटील, कृष्णत मारुती पाटील, सुहास शंकर पाटील, रमेश शंकर हिमणे, आनंदराव तुकाराम पाटील तसेच संजय रामचंद्र पाटील यांचे घरांना आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून आगीमध्ये सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरपीआय है ना, मनसे के पीछे क्यू पडे हो? रामदास आठवलेंचा भाजपला सवाल