Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रवी राणाला सांगतो मी ५ तारखेला घरी आहे त्याने मारायला यावं- बच्चू कडू

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (21:04 IST)
आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीवरून केलेले विधान मागे घेत असल्याचं सांगत माझ्याकडून हा विषय संपला असल्याचं जाहीर केले. मात्र त्यानंतर बच्चू कडू यांनी मेळावा घेत अप्रत्यक्षपणे रवी राणा यांना माफ करत इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा कडू यांच्या विधानावरून रवी राणा यांनी तोंडसुख घेत त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. त्याला बच्चू कडू यांनीही आम्ही तयार आहोत असं प्रत्युत्तर दिले आहे.
 
बच्चू कडू म्हणाले की, मी भाषणात कोथळा काढू म्हटलं, त्यात रवी राणाचं उल्लेख केला नव्हता. कुणी आमच्यावर विनाकारण आरोप करत असेल तर त्याचा कोथळा बाहेर काढू असं बोललो होतो. आता रवी राणांनी ते स्वत:वर ओढावून घेणे हा त्यांचा विषय आहे. राहिला विषय घरी येऊन मारण्याचा तर मी तयार आहे. त्याने घरी यावं अथवा अन्य कुठे बोलवावं मी तिथे येतो असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.

त्याचसोबत रवी राणाने हा वाद पुन्हा सुरू केला. सवय आहे तो एवढा मोठा नाही. मी आमदार होणार की नाही हे जनता ठरवणार आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. परंतु रवी राणाला सांगतो मी ५ तारखेला घरी आहे त्याने मारायला यावं. मी शांतता बाळगणार आहे. त्याला मारायचं असेल तर ५ तारखेला किती वाजता घरी येणार सांगावं, मी तयार आहे, मार खायलाही तयारी आहे असा प्रतिइशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणांना दिला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

लातूरमधील शाळेत घुसून तोडफोड करत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

इस्रोचे 101 वे मिशन अयशस्वी, पीएसएलव्ही रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

अजित पवारांनी लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप केले

महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

पुढील लेख
Show comments