Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व पुरावे अमित शहांना देणार : फडणवीस

fadnavis given alI evidence to amit shah  will give all the evidence to Amit Shah: Fadnavis maharashtra news regional marathi news
, शुक्रवार, 5 मार्च 2021 (21:01 IST)
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर हल्ला चढवला आहे. त्यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे अमित शहांना देणार असल्याचे म्हटले आहे. 
 
त्यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोणाला वाचवायचा प्रयत्न असल्याने सरकार एनआयकडे तपास द्यायला तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून एकंदरीत प्रकरणावरून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत.  ते पुढे म्हणाले की, सर्व राहणारे ठाण्यामधील आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यात सापडतो. हा योगायोग नाही. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी केली आहे. मात्र, गृहमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा आम्हाला संशय आहे असे फडणीस यांनी सांगितले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले