Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येवल्यात आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी आले असते तर…-छगनराव भुजबळ

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2023 (08:07 IST)
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे पंधरा वीस वर्षांपूर्वी येवला येथे आले असते तर त्यांना फरक लक्षात आला असता असा उपरोधिक टोला राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी लगावला.
 
सध्या सुरू असलेल्या पावसाळा अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी असल्याने राजधानी एक्स्प्रेसने ना. भुजबळ नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, कैलास मुदलीयार, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख आदींनी त्यांचे स्वागत केले.
 
शरद पवार यांच्या नंतर आदित्य ठाकरे येवला येथे येत असल्याबाबत विचारले असता ना. भुजबळ म्हणाले की, निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते फिरत आहे. अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी असल्याने ठाकरे यांचा दौरा असावा. मात्र, आदित्य ठाकरे हे पंधरा वीस वर्षांपूर्वी येवला येथे आले असते तर तेव्हाचा व आत्ताचा फरक लक्षात आला असता.
 
भुजबळांनी येवल्याचा विकास करून कायापालट केला अश्या अर्थाने त्यांनी ठाकरे यांना उपरोधिक टोला लगावला.
जुने नाशकातील काझी गढी मागील काळात कोसळली, सध्याही धोकादायक परिस्थिती त्या ठिकाणी असून मनपा प्रशासनाने काळजी घेऊन उपाययोजना केल्या पाहिजे असे ही भुजबळ म्हणाले.
 
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील रहिवासी यांनी मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केल्या बाबत सांगितले की, सरकार या बाबत सकारात्मक आहे, भविष्यात आवश्यक ते करता येईल कारण खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सध्या नागरिक पावसाची, धबधब्याची मजा घेण्यासाठी लहान मोठ्या गड किल्ल्यावर जातात.
 
त्र्यंबकेश्वर जवळील पहिने या ठिकणी लोक गर्दी करतात. आपल्या कडे पाऊस जोर धरेल. कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ना. भुजबळ म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments