Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (20:50 IST)
गेले अडीच महिन्यांपासून कोल्हापूरचे आयुक्तपद रिक्त आहे.जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी आम आदमी पार्टीने लावून धरली आहे. मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते.या पार्श्वभूमीवर आप युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत “दादा, मुंबईला पोचलासा काय? पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या” अशा आशयचे पोस्टर धरून शहरातील छ.शिवाजी चौक, दसरा चौक यासारख्या विविध चौकात नागरिकांचे लक्ष वेधले. “शासन आपल्या दारी, पण आयुक्त नाही कोल्हापूर नगरी”, “सरकार एका रात्रीत बनतंय, मग आयुक्त द्यायला 3 महिने का” असे पोस्टर झळकवत महानगरपालिकेला आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले.
 
गेल्या दीड महिन्यापासून कोल्हापूर शहराला आयुक्त नाही. शहराला आयुक्त मिळावा यासाठी अजित पवार यांची समितिने  भेट घेऊन त्यांना विनंती केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments